बालिका वधू फेम प्रसिध्द अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन

By  
on  

प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन झालं आहे. आज सकाळी हदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं वृत्त आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री होत्या. २०१८ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तसंच २०२० साली ब्रेन स्ट्रोकचा त्रासही त्यांना झाला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती गंभीर होती.

 

सुरेखा यांना त्यांच्या बालिका वधू या मालिकेमधल्या शिस्तप्रिय 'दादीसा'च्या भूमिकेने घराघरात पोहोचवलं होतं. तर बधाई हो या चित्रपटातली त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. 

 

 

(Source: The Indian Express)

Recommended

Loading...
Share