पाहा Video : 'मीमी'च्या 'परम सुंदरी' गाण्यात सई ताम्हणकरच्या अदा, क्रिती सनॉनसोबत केला धमाकेदार डान्स

By  
on  

सरोगसीवर आधारित 'मीमी' हा सिनेमा प्रदर्शनाआधिच लक्षवेधी ठरतोय. सिनेमाच्या ट्रेलरनंतर नुकतच नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलय. या गाण्यात अभिनेत्री क्रिती सनॉन आणि सई ताम्हणकर झळकतायत. 'परम सुंदरी' असे या गाण्याचे बोल आहेत. या धमाकेदार गाण्यात क्रिती सनॉन आणि सई ताम्हणकरचा डान्स आणि अदा पाहायला मिळतायत. या सिनेमाच्या निमित्ताने क्रिती सनॉन आणि सई पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसतील.

अमित भट्टाचार्य यांचे गीत आणि लोकप्रिय प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांचं संगीत या गाण्याला लाभलय. गायिका श्रेया घोषालच्या आवाजातील हे धमाकेदार गाणं नुकतच प्रदर्शित झालय. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित मीमा या सिनेमात क्रिती सनॉन, पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 

विविध मराठी सिनेमांमधून सईची गाणी लोकप्रिय ठरली आहेत. याशिवाय 'हंटर' या हिंदी सिनेमातील सईवर चित्रीत केलेली गाणी लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर आता 'परम सुंदरी' गाण्यातील क्रितीसोबतच्या सईच्या अदा आणि धमाकेदार डान्स प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय. 

या सिनेमात अभिनेत्री सई ताम्हणकर शमा ही व्यक्तिरेखा साकारतेय. या सिनेमातील सईची ही भूमिकात आणि तिचा अभिनय पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Recommended

Loading...
Share