'डान्स दिवाने 3' च्या मंचावर माधुरी आणि रेखा यांनी रीक्रिएट केला 'सिलसिला'चा तो आयकॉनिक सीन

By  
on  

'डान्स दिवाने 3' च्या मंचावर अनेक पाहुणे मंडळी येत असतात. परिक्षक धकधक गर्ल माधुरी दीक्षितसह ही पाहुणे मंडळीही लक्ष वेधतात. एकीकडे या कार्यक्रमातील स्पर्धकांचे एकापेक्षा एक धमाकेदार डान्स पाहायला मिळतात. तर दुसरीकडे माधुरी दीक्षितचं या कार्यक्रमात असणं प्रेक्षकांसाठी खास पर्वणी असते. त्यातच जर खास पाहुणे मंडळी आली की मग डबल धमाका पाहायला मिळतो. या कार्यक्रमाचा असाच एक खास भाग पाहायला मिळणार आहे. जेव्हा एव्हरग्रीन रेखा यांनी या कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली.

रेखा आणि माधुरी यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र पाहणं हीच खास पर्वणी होती. त्यात दोघांचा एकत्र डान्स,परफॉर्मन्स यांनी तर चार चाँद लावले. रेखा यांच्या हजेरीने शो ची शोभा आणखी वाढली. मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं ते एका खास गोष्टीने. 'सिलसिला' या रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या सिनेमाचा सीन यावेळी मंचावर सादर करण्यात आला. हा आयकॉनिक लोकप्रिय सीन रेखा यांनी डान्स दिवानेच्या मंचावर सादर केला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

हा सीन करताना रेखा यांना साथ होती ती चक्क माधुरी दीक्षितची. रेखा आणि माधुरी एकत्र मंचावर आले आणि त्यांच्या आवाजातच त्यांनी हा सीन केला. बॉलीवुडच्या या सौंदर्यवती मंचावर एकत्र होत्याच शिवाय 'सिलसिला' सिनेमातील या सीन मधील डायलॉगने सगळ्यांचं लक्ष वेधलं.

सोशल मिडीयावर रेखा आणि माधुरी यांचा हा सीन चर्चेत असून व्हायरल होताना दिसतोय. लवकरच कलर्स वाहिनीवर हा खास भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Recommended

Loading...
Share