By  
on  

युट्युबचा प्रताप ! तमिळ अभिनेता सिद्धार्थला केलं मृत घोषित

दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थसोबत वेगळाच प्रकार घडला आहे. अलीकडेच यूट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये कमी वयात जगाचा निरोप घेतलेल्या दहा दाक्षिणात्य कलाकारांची नावं होती. या यादीमध्ये तमिळ अभिनेता सिद्धार्थचं सुद्धा नाव देण्यात आलं. एका फॅनने या व्हिडीओचा एक स्क्रीनशॉट काढून तो सोशल मीडियावर शेअर केला.

 

 

हा स्क्रीनशॉट व्हायरल होताच सिद्धार्थच्या फॅन्समध्ये चिंता पसरली. ही बाब समोर येताच  सिद्धार्थने स्वतः पुढे येत या अफेवेवर पूर्णविराम लावला आणि ट्विट करत सत्य परिस्थिती सांगितली. सिद्धार्थने या प्रकरणाबाबत तक्रार दाखल केली असता युट्युबने आश्चर्यचकित करणारं उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आम्हाला काहीच गैर दिसत नाही, असं उत्तर यूट्यूबने दिलं आहे. हे उत्तर ऐकून सिद्धार्थसह चाहतेही हैराण झाले असल्यास शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive