By  
on  

कोर्टात राज कुंद्राचे वकील म्हणतात, 'कंटेट वल्गर होता पण त्यात अश्लील असं काहीच नव्हतं'

मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल एपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर राज कुंद्रा चर्चेत आहे. राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केल्याची माहिती मिळतेय. या  प्रकरणी त्याला २३ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय.

टाईम्स ऑफ इंडीयाच्या वृत्तानुसार, मंगळवारी राजच्या वकीलांनी कोर्टात असं म्हटलंय की हा कंटेट अश्लील नव्हता.राज हे अश्लील कंटेट बनवतात हे अद्याप पूर्णपणे सिध्द झालेलं नाही. तसंच राजचे वकील पुढे असंही म्हणाले, की राज कुंद्रा यांची अटक कायदेशीर नाही. 

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्याने बॉलिवूडमध्ये सध्या खळबळ माजली आहे. एका रिपोर्टनुसार, पोलिसांनी राज कुंद्राच्या विआन कंपनीवर छापा टाकला असता अनेक महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत.राज कुंद्रा लवकरच शूटिंग थांबवून बॉलिफेमवर मॉडेल्स आणि अभिनेत्यांकडून लाईव्ह स्ट्रिमिंग करुन घेणार होता अशी क्राइम ब्रांचला शंका आहे

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive