राज कुंद्रावर आरोप करणा-या सागरिका शोना सुमनला बलात्कार आणि जीवे मारण्याचा धमक्या

By  
on  

पॉर्न सिनेमाची निर्मिती केल्या प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला सोमवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. पॉर्न सिनेमे बनवून मोबाईल अ‍ॅप्लीकेशनद्वारे ते रिलीज केल्याचा आरोप राजवर आहे. या प्रकरणी  राज कुंद्राने न्युड ऑडिशन देण्यासा सांगितल्याचा खळबळजनक आरोप अभिनेत्री सागरिका सोना सुमनने केला होता. 

 

त्यानंतर आता तिने आणखी एक खुलासा केला आहे. ‘सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवरून फोन आणि मेसेज करत धमकी मिळतमला जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देत आहेत. लोक मला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत आहेत आणि बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.’ या सगळ्या धमक्यांविरोधात तक्रार करणार असल्याचंही तिने सांगितलं आहे.

Recommended

Loading...
Share