पतीच्या अटकेनंतर शिल्पाची शेट्टीची भावनिक पोस्ट, जरुर वाचा

By  
on  

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक करण्यात आलेल्या अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये आता शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली जाणार आहे. 
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने  जुहू येथील शिल्पा आणि राज यांच्या घरावर छापा टाकला. मुंबई जिल्हा न्यायालयाने राज कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीमध्ये पाच दिवसांनी वाढ करुन ती २७ जुलैपर्यंत केली आहे.  पोलीस कुंद्रा यांना घेऊन थेट त्यांच्या जुहूतील घरी दाखल झाले. या दोघांचं करिअर एका नाजुक वळणावर येऊन पोहोचलंय. 
एकीकडे पोर्नोग्राफी रॅकेट प्रकरणात पोलिस कस्टडीमध्ये असलेल्या राज कुंद्रा या प्रकरणात गुंततानाच दिसतोय. तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी तब्बल १४ वर्षानंतर पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. तिचा बहुचर्चित ‘हंगामा २’ हा चित्रपट डिज्नी हॉटस्टार रिलीज होतोय. अभिनेत्री शिल्पा शेट्टी अनेक वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा बॉलवूडमध्ये कमबॅक करतेय. यासाठी ती खूपच उत्सुक होती. परंतु राजच्या पोर्नोग्राफिक्स फिल्म निर्मिती प्रकरणातील अटेकमुळे तिचंसुध्दा करिअर धोक्यात आहे. 

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी सुद्दा माध्यमांपासून थोडं अंतर  ठेवताना दिसून आली. इतकंच काय तर शिल्पा तिच्या ‘सुपर डान्सर’ च्या सेटवर शूटसाठी देखील गैरहजर राहिली. 

 
 

हंगामा २ सिनेमाशी निगडीत शिल्पाने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर केली आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. मी योगाचा अभ्यास करते आणि त्यातून मिळणाऱ्या शिक्षणावर माझा विश्वास आहे. “मी योगाचा अभ्यास करते आणि त्यातून मिळणाऱ्या तत्वज्ञानावर माझा विश्वास आहे. आयुष्य एकाच ठिकाणी अस्तित्वात असते आणि ते म्हणजे तुमच्या वर्तमानात. हंगामा २ या चित्रपटात संपूर्ण टीमची मेहनत आहे. हा चित्रपट चांगला बनवण्यासाठी प्रत्येक कलाकारने प्रचंड मेहनत घेतली आहे आणि कोणत्याही इतर गोष्टीचा या चित्रपटावर परिणाम व्हायला नको. म्हणून आज मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचा मेहनतीसाठी तुम्ही हंगामा २ पाहा. हा चित्रपट पाहताना नक्कीच तुम्हाला आनंद होईल. धन्यवाद. कृतज्ञता. शिल्पा शेट्टी कुंद्रा, अशा आशयाची पोस्ट शिल्पाने केली आहे.,” अशा आशयाची पोस्ट शिल्पाने केली आहे.

Recommended

Loading...
Share