राज कुंद्रा प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठचीही होणार चौकशी

By  
on  

राज कुंद्राच्या ऑफिस आणि बंगल्यांमध्ये छापे मारल्यानंतर चार लोकांची चौकशी क्राईम ब्रांच करणार आहे. यामध्ये अभिनेत्री गहना वशिष्ठसह आणखी तीन लोकांचा समावेश आहे. आज या व्यक्तींची चौकशी केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. 
या प्रकरणात आतापर्यंत अनेक खुलासे होताना दिसत आहेत. राजच्या वियान आणि जेएल स्ट्रीम ऑफिसमध्ये एक लपवलेलं कपाट सापडलं ज्यात अडल्ट कंटेट मोठ्या प्रमाणावर आहे. 

 

शिल्पा राजच्या या बिझनेसमध्ये पार्टनर असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय या बिझनेसमधील काही पैसेही शिल्पाच्या खात्यावर ट्रान्सफर केले जात होते. याशिवाय यातील कटेंट शिल्पाला विचारुन ठरवला जात असल्याचंही बोललं जात आहे. पण शिल्पाच्या निकटवर्तीयांनी कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

Recommended

Loading...
Share