PeepingMoon Exclusive: राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या अडचणीत होणार वाढ ?

By  
on  

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. १९ जुलै रोजी त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. शुक्रवारी २३ जुलै रोजी राजला भायखळा कारागृहातून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. 
 

मुंबई पोलिसांनी याचसंदर्भात राज यांची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी शिल्पा शेट्टीची तब्बल सहा तास चौकशी केली होती. शिल्पाने या चौकशीत पोलिसांना हे सांगितलं की, तिला हॉटशॉट एपच्या कंटेटबद्दल जास्त माहिती नव्हती. पण या चौकशी दरम्यान पोलिसांचा शिल्पावरचा संशय आणखी बळावला आहे. 
 

PeepingMoon.com ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी शिल्प शेट्टीची पुन्हा चौकशी होणार आहे. पण यावेळेस पोलिस हे शिव्पाच्या जुहूतील बंगल्यात नाही तर तिला मुंबईच्या क्राईम ब्रांचच्या कार्यालयात बोलवून तिची कसून चौकशी करणार आहेत. 

Recommended

Loading...
Share