लोकप्रिय कन्नड अभिनेत्री जयंती यांचं निधन, दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा

By  
on  

भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्गज अभिनेत्री जयंती यांचं निधन झालं आहे. जयंती यांनी आज जगाचा निरोप घेतला. त्या ७६ वर्षांच्या होत्या. जयंती यांनी विविध भाषांमधील सिनेमांमध्ये काम केलं होतं. मात्र खास करून कन्नड सिनेमासाठी त्यांचं मोलाचं योगदान लाभलं होतं. कन्नड सिनेमातील यशस्वी अभित्रींपैकी त्या एक होत्या

 

जयंती यांनी कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केलंय. जयंती यांना त्यांच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. 

Recommended

Loading...
Share