शिल्पा शेट्टीच्या जागी रितेश आणि जेनेलिया करणार 'सुपर डान्सर -4' चं परिक्षण

By  
on  

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीसुध्दा बरीच अडचणीत सापडली आहे.  तिलासुध्दा चौकशीच्या फे-यांना सामोरं जावं लागतंय. म्हणूनच शिल्पा ‘सुपर डान्सर- ४ या रिएलिटी शोला उपस्थित राहू शकत नाहीय. मागच्या आठवड्यात तिच्या जागी गेस्ट जज म्हणून करिश्मा कपूरने हजेरी लावली होती. तर आगामी एपिसोडमध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया हजेरी लावणार आहेत.

या वेळी गीता कपूर आणि अनुराग बासूसोबत परिक्षक म्हणून रितेश आणि जेनेलिया दिसणार आहेत. सुत्रांनी ‘ टाइम्स ऑफ इंडीयाला’ दिलेल्या वृत्तानुसार, रितेश आणि जेनेलिया यांना निर्मात्यांनी शोसाठी विचारले होते. एवढंच नाही तर निर्मात्यांनी विचारताच रितेश आणि जेनेलियाने होकार दिला आहे. त्या दोघांना हा शो प्रचंड आवडत असल्याचे सांगत त्यांनी लगेच होकार दिला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

Recommended

Loading...
Share