पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला कोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

By  
on  

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. १९ जुलै रोजी त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. शुक्रवारी २३ जुलै रोजी राजला भायखळा कारागृहातून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. 

आपली अटक बेकायदेशीर असल्याने आपल्याला तातडीने जामीन देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज राज कुंद्राने हायकोर्टात दाखल केला होता. त्यावर सुनावणी करताना राज कुंद्राची अटक बेकायेदशीर असल्याचा दावा कोर्टाने अमान्य केला. राज कुंद्राला जामीन देण्यास कोर्टाने नकार दिल्यामुळे त्याच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार आहे.

 

राज कुंद्रा यांचा अश्लील चित्रपटांच्या निर्मितीमध्ये सक्रिय सहभाग होता, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. मुंबई क्राइम ब्रँचनेही राज कुंद्रा यांच्या विरोधात ठोक इलेक्ट्रॉनिक पुरावे असल्याचा दावा केला आहे. पॉर्न फिल्मच्या बदल्यात व्यवहार केल्याचे पुरावे मुंबई पोलिसांनाही मिळाले आहेत. त्याचबरोबर, अंमलबजावणी संचालनालय देखील या प्रकरणात सक्रिय झाले आहे.

Recommended

Loading...
Share