इनसायडर ट्रेडिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी शिल्पा आणि राज कुंद्राला तीन लाखांचा दंड

By  
on  

राज कुंद्राच्या अटकेला आज दहा दिवस झाले आहेत. पोर्नोग्राफीक सिनेमे बनवल्याप्रकरणी राजला अटक केली झाली. या प्रकरणात राज मुख्य संदिग्ध होता. सध्या तो न्यायालयिन कोठडीत आहे. आता शिल्पा आणि राज आणखी एका संकटात सापडले आहेत. राज आणि शिल्पावर इनसायडर ट्रेडिंगचा आरोप आहे.

सेबीने राज, शिल्पा आणि कंपनी वियान इंडस्ट्रीजवर इनसायडर ट्रेडिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तीन लाखांचा दंड ठोठावला आहे. कालच कोर्टाने त्याचा जामीन अर्जही फेटाळला आहे. आता या प्रकरणामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे हे नक्की. राजची रवानगी भायखळा जेलनंतर आर्थर रोड जेलमध्ये झाली आहे.

Recommended

Loading...
Share