By  
on  

19 ऑगस्टला सिनेमागृहात चाहत्यांना 3D स्वरुपात पाहता येणार अक्षय कुमारचा 'बेल बॉटम'

खिलाडी अक्षय कुमारचा 'बेल बॉटम' सिनेमा 19 ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अक्षय कुमारची ही फिल्म पहिली बिग तिकीट रिलीज असल्याचं बोललं जातय. या सिनेमाच्या प्रदर्शनाला काहीच दिवस बाकी असताना सिनेमाच्या मेकर्सनी खास अनाउंसमेंट केली आहे. हा सिनेमा आता 2डी सोबतच थ्रीडी (3D) स्वरुपात प्रदर्शित होणार आहे. तेव्हा अक्षयचा हा सिनेमा त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना थ्रीडीमध्ये अनुभवता येईल. 

 'बेल बॉटम' सिनेमाचा मुख्य अभिनेता खिलाडी अक्षय कुमारने नुकताच एक व्हिडीओ प्रदर्शित केलाय. या व्हिडीओत अक्षयने या सिनेमाच्या थ्रीडी रिलीजची घोषणा केली आहे. सोशल मिडीयावर अक्षयसह या सिनेमाच्या टीमने या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेसह थ्रीडी रिलीजची घोषणा केली आहे. 

 

 'बेल बॉटम' ची निर्मिती पूजा एन्टरटेन्मेंट ने केली असून रंजीत तिवारी यांनी दिग्दर्शन केलय. हा एक स्पाय एक्शन थ्रिलर सिनेमा असणारेय. अक्षयसह या सिनेमात अभिनेत्री वाणी कपूरही झळकणार आहेत. तर लाता दत्ता आणि हुमा कुरैशी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील.

Recommended

PeepingMoon Exclusive