By  
on  

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीचं पहिलं स्टेटमेंट, एक आई म्हणून विनंती करते आमच्या मुलांसाठी तरी ...

प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेले काही दिवस सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. कारण तुम्हाला माहितच आहे. शिल्पाचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील व्हिडीओ बनवून ते प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. १९ जुलैपासून राजला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पतीला अटक झाल्यापासून शिल्पादेखील चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. राजनंतर मुंबई पोलिसांकडून शिल्पाच्या या प्रकरणातील संबंधांची देखील चौकशी करण्यात येत आहे.

माझं स्टेटमेंट म्हणून शिल्पानं सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली आहे. यात शिल्पा म्हणते, माझा मुंबई पोलिसांवर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. न्याय मिळवण्यासाठी आम्ही कायदेशीर मार्गच अवलंबू. पण माझी सर्वांना विनंती आहे, कृपया माझ्या मुलांसाठी तरी आमच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करु नका. लोकांनी नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला आहे, आणि मी कोणाचाच कधी विश्वासघात केलेला नाही. 

 

गेले काही दिवस माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आव्हानात्मक होते. अनेक आरोप आणि अफवा पसरवल्या जात आहेत. माध्यमं आमि आमचं चांगलं न चिंतणारे लोक खुप वाईट गोष्टी पसरवत आहेत. ट्रोलिंग केलं जातंय. मी कुठल्याच गोष्टीवर प्रतिक्रीया देणार नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. 
 

 

मी एक आई म्हणून विनंती करते, आमच्या मुलांसाठी तरी आमच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करु नका. कोणत्याही गोष्टीची खातरजमा न करता त्याविषयी बोलू नका. न्यायव्यवस्थेला त्यांचं काम करु द्या.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive