By  
on  

‘आईवरील बायोपिक माधुरीने सादर करावा’, सरोज खान यांच्या मुलीची इच्छा

यावर्षी 3 जुलैला सरोज खान यांचं निधन झालं. त्यानंतर टी-सिरीजने सरोज यांच्या बायोपिकची घोषणा केली आहे. त्यासंदर्भातील राईट्सही टी- सिरीजला मिळाले आहेत. रेमो डिसुजा या सिरीजला दिग्दर्शित करणार असल्याचं बोललं जात होतं. पण त्यांनी या बातमीचं खंडन केलं आहे. हे सगळं सुरु असताना सरोज खान यांची मुलगी सुकन्या खान हिने मात्र ‘आईवरील बायोपिक माधुरीने सादर करावा’ अशी इच्छा व्यक्त केली आहे.

 

सुकन्या म्हणतात, ‘ भुषण कुमार यांनी तिच्याशी संपर्क केला होता. आईच्या निधनानंतर त्यांनी आमच्यासमोर हा विषय काढला होता. आईची गोष्ट लवकर पडद्यावर यावी असं आम्हाला वाटतं. माधुरीने ही कथा सादर केली तर मला नक्कीच आनंद होईल. माझी आई आणि माधुरी एकमेकींच्या खुपच जवळ होत्या. अर्थातच शुटिंग पुर्वी स्क्रिप्टवर नक्कीच नजर टाकू जेणेकरून आईचा संघर्ष लोकांना समजेल.

Recommended

PeepingMoon Exclusive