By  
on  

"बचपन का प्यार.." या व्हायरल होणाऱ्या गाण्याचा हा आहे मूळ गायक

सोशल मिडीयावर काय व्हायरल होईल आणि कशाची चर्चा होईल काही सांगता येत नाही. सध्या सोशल मिडीयावर बचपन का प्यार हे गाणं प्रचंड व्हायरल झालय. सहदेव कुमार या लहान मुलाने हे गाणं गायलं आणि त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. त्याचे अनेक रिमिक्स वर्जनही बनले. हा लहान मुलगा तर इंटरनेट सेंसेशनच बनलाय. या लहान मुलाच्या आवाजातील हे गाणं इतक पसंत केलं गेलं की इन्स्टाग्राम उघडल्यावर सगळीकडे सध्या हेच गाणं वाजताना दिसत आहे. सध्या सोशल मिडीयावर अनेक सेलिब्रिटी देखील या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. 

मात्र हे गाणं फार जुनं असल्याचं समोर आलय. लहानग्या सहदेवने हे गाणं गायलं असलं तरी या गाण्याचा मूळ गायक वेगळा आहे. शिवाय सहदेवचा हा व्हिडीओही फार जुना आहे. 2019 मध्ये सहदेवच्या शिक्षकाने हा व्हिडीओ शूट केला होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BADSHAH (@badboyshah)

 

मात्र हे गाणं गुजरातमधील एक आदिवासी लोकगायक कमलेश बरोटने गायलं आहे. 2018 मध्ये हे गाणं बनवण्यात आलं होतं. मयूर नदिया यांनी या गाण्याला म्युझिक दिलं होतं. पी. पी. बरियाने हे गाणं लिहीलय. या गाण्याला तेव्हाही चांगली पसंती मिळाली होती. म्हणूनच की काय सहदेवने हे गाणं म्हटलं होतं.

 

मात्र इतक्या वर्षांनी या गाण्याला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. विशेषकरुन छोटा सहदेव चांगलाच फेमस झाल्याचं चित्रही पाहायला मिळतय. प्रसिद्ध रॅपर बादशाहने देखील सहदेवसोबत हे गाणं वेगळ्या वर्जनमध्ये गायलय. हिंदीसह अनेक मराठी कलाकारांनीही या गाण्यावर विविध व्हिडीओ केले आहेत. हे मजेशीर व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

Recommended

PeepingMoon Exclusive