By  
on  

धुर्त, साहसी आणि हुशार रॉ एजंटच्या धाडसाची दमदार गोष्ट, पाहा बेल बॉटमचा ट्रेलर

अक्षयचा आगामी सिनेमा ‘बेल बॉटम’ साठी चाहते खुपच उत्साही होते. आता या सिनेमाचा दमदार ट्रेलर समोर आला आहे. बेल बॉटम’ च्या ट्रेलरमध्ये अक्षयचा अनोखा अंदाज दिसून येत आहे. हा सिनेमा ख-या घटनेवर आधारित असल्याचं ट्रेलरच्या सुरुवातीलाच समजतं. 1984 मध्ये हायजॅक झालेल्या विमानाच्या आसपास ही कथा फिरताना दिसते. या मोहिमेवर भारताच्या हुशार कोडनेम ‘बेल बॉटम’ असलेल्या अधिका-याची नेमणुक केली जाते.

 

 

या सुटकेचा थरार या सिनेमात दिसतो आहे. हा सिनेमा 19 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 1980 काळात घडलेल्या एका ख-या  कथानकावर आधारित थ्रीलर पठडीतला बेलबॉटम हा सिनेमा करोना पार्श्वभूमीवर आपलं शूटींग नियोजितरित्या पूर्ण करणारा पहिला सिनेमा ठरला आहे. बरीच आव्हानं पेलत 'बेल बॉटम' हा सिनेमा आता प्रदर्शनासाठी सज्ज होतोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive