By  
on  

रौप्य पदक विजेती मीराबाई चानूचं धकधक गर्ल माधुरीला भेटण्याचं स्वप्न सत्यात उतरलं

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदकं मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूवर संपूर्ण देशभरातून आणि सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. इतकी मोठी दमदार कामगिरी करुनही मीराबाई चानूचे पाय हे जमिनीवरतीच आहेत. हे तिने दाखवून दिलंय. मीराबाईचे अनेक फोटो, व्हिडीओ यादरम्यान व्हायरल झाले. सचिन तेंडूलकर, सलमान खान यांची भेट घेतल्यानंतर मीराबाईने धकधक गर्ल माधुरीची नुकतीच भेट घेतली. डान्स दिवाने मंचावर बॉलिवूडच्या या सौंदर्यसम्राज्ञीला भेटण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचं मीराबाईने सांगितलं. 

माधुरी दीक्षितला भेटल्यानंतर मीराबाईचा आनंद ओसंडून वाहत होता. माधुरीच्या भेटीने यावेळी मीराबाई भावूक झाल्याचं दिसून आलं. १५ ऑगस्टला भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या नित्ताने ‘डान्स दीवाने शोमध्ये ‘सलाम इंडिया’ नावाने खास एपिसोड पाहायला मिळेल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

. या खास एपिसोडमध्ये मीराबाईचा खडतर प्रवास दाखवणारा परफॉर्मन्स पाहून सगळेच थक्क झाले. तर हा डान्स परफॉर्मन्स पाहून मीराबाईदेखील भावूक झाली आणि तिला अश्रू आवरणं कठिण झालं. मीराबाईलासुध्दा डान्सची प्रचंड आवड आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive