By  
on  

‘सुई-धागाती’ल अनुष्का सोशल मिडीयावर अशी झाली ट्रोल

अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सुई धागा मेड इन इंडिया’ हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका गरीब आणि परिस्थितीने गांजलेल्या एका जोडप्याची ही कथा आहे. हे जोडपं शिलाईच्या जोरावर स्वत:चा एक कपड्यांचा ब्रॅंड कसा तयार करतात, या प्रवसाची ही यशोगाथा आहे. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वकांक्षी प्रोजेक्टवर हा सिनेमा आधारित आहे. मौजी या व्यक्तिरेखील वरूण आणि ममताच्या व्यक्तिरेखेत अनुष्का ही जोडी फार शोभून दिसतेय. दोघांनी अगदी सामान्य व्यक्तीसारखा पारंपारिक लूक या सिनेमासाठी ठेवला आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच काही दिवसांपूर्वी उलगडला आणि त्याचे बरेच कौतुकही करण्यात आले. पण आज सोशल मिडीयाचे युग असल्याने ट्रोलर्सकडून कुठल्या फोटो आणि व्हिडीओवर कशी प्रतिक्रिया येईले हे तुम्ही ठरवू शकत नाही. मग यातून सेलिब्रिटीसुध्दा वाचलेले नाहीत. ‘सुई धागा’च्या ट्रेलरमध्ये अनुष्का शर्मा एका सर्वसाधारण गरीब कुटुंबातल्या महिलेच्या रुपात दिसतेय आणि तसेच हावभावसुध्दा तिने सिनेमात दिले आहेत. पण यामुळेच तिच्यावर ट्रोलर्सनी निशाणा साधत तिचे विविध Meme ट्विट करत व्हायरल केले आहेत. तुम्हालासुध्दा अनुष्कावर तयार झालेले हे विविध Meme पाहून हसू आवरता येणार नाही.

"So, your new president is Donald John Trump."
Statue of Liberty: pic.twitter.com/2fzXxxnxha

Mom's reaction after I cleared 12th exams on my 5th attempt. pic.twitter.com/IzJJ8Fz4Yb

When finally it's your turn to sit on Window Seat in Mumbai Local. pic.twitter.com/XznwlrhRPy

यशराज बॅनरअंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘सुई धागा मेड इन इंडिया’सिनेमात वरुण धवन आणि अनुष्का शर्मा दोघंही प्रथमच या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र झळकत आहेत. सर्वांनाच या सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. शरत कटारिया दिग्दर्शित ‘सुई धागा मेड इन इंडिया’ 28 सप्टेंबर 2018 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive