By  
on  

पाहा Video : "आयुष्याचा धडा" म्हणत रितेश देशमुखने वडील विलासराव देशमुख यांचा हा व्हिडीओ केला शेयर

अभिनेता रितेश देशमुखसाठी त्याचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे प्रेरणास्थान आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून रितेश कायम त्याच्या वडीलांविषयीचं प्रेम आणि आदर व्यक्त करताना दिसतो.

नुकतीच विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी पार पडली. त्यावेळी वडीलांच्या आठवणींना उजाळा देत रितेशने सोशल मिडीयावर खास पोस्टही शेयर केली होती. मात्र नुकतच आणखी एक व्हिडीओ शेयर करत रितेशने वडीलांच्या आठवणीना उजाळा दिलाय. रितेशने विलासराव यांच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. "आयुष्याचा धडा, खूप काही शिकण्यासारखं.." अस लिहीत हा व्हिडीओ शेयर केलाय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

या व्हिडीओत विलासराव देशमुख हे त्यांचे संस्कार आणि शैलीविषयी बोलताना दिसत आहेत. ते म्हणतात की, "माझे सर्वाशी प्रेमाचे संबध आहेत. माझ्या विरुद्ध बोलणाऱ्याशी किंवा टीका करणाऱ्यासोबतही मी प्रेमाने बोलतो किंवा वागतो. मी पटकन व्यक्त होणारा नाही. मी कृतीतून व्यक्त होतो. प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी असते. काही लोक अधिक आक्रमक असतात ते अनेकांना बरे वाटतात. मात्र माझा त्यावर विश्वास नाही. कारण मी त्या संस्कृतीतून आलेलो नाही. आपण शांतपणे आणि संयमाने राज्यकारभार करून लोकांशी वागलं पाहिजे."

रितेशने वडीलांच्या आठवणीत शेयर केलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंत केला जातोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive