By  
on  

पाहा Photo : 'मीमी' सिनेमाला पूर्ण झाला एक महीना, सई ताम्हणकरने शेयर केल्या या आठवणी

'मीमी' या हिंदी सिनेमाला नुकताच एक महीना पूर्ण झालाय. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्यानंतर आता सिनेमातील कलाकार एक महीना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आनंद व्यक्त करतायत. अभिनेत्री क्रिती सनॉननेही या सिनेमाच्या सेटवरील आठवणी फोटोस्वरुपात शेयर केल्या आहेत.

तर या सिनेमात शमाच्या भूमिकेत लक्षवेधी काम करणारी अभिनेत्री सई ताम्हणकरनेही या सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिलाय. सईने सेटवरील क्रिती सनॉनसोबतचे फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 

सई या पोस्टमध्ये लिहीते की, "आज मीमीला एक महीना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने. एका परफेक्ट पिक्चरची कहाणी. सगळ्यात मस्त व्यक्ति क्रिती सनॉन, तू आनंद आहेस. तू आमची मीमी आहेस. तुझी शमा बनणे आवडले."

क्रिती सनॉनसोबतच सई ताम्हणकरची व्यक्तिरेखा देखील या सिनेमात लक्ष वेधून घेत आहेत. सई ही या सिनेमात क्रितीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत झळकतेय. या सिनेमात 'परम सुंदरी' हे गाणं सध्या चांगलच चर्चेत आलय. या गाण्यात क्रिती सनॉनसोबत सई ताम्हणकरदेखील झळकतेय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive