By  
on  

वाढदिवसादिवशीच शिबानी दांडेकरने फरहानसाठी केलं हे खास काम

मॉडेल, अ‍ॅंकर, अभिनेत्री शिबानी दांडेकर आज 41 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. या वाढदिवसाला शिबानीने बॉयफ्रेंड फरहानला खास भेट दिली आहे. शिबानीने एक फोटो शेअर केला आहे. यात तिने फरहानच्या नावाचा एक टॅटू काढला आहे. हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.  तिनं आपल्या हातावर देखील एक टॅटू गोंदवुन घेतल्याचे दिसुन आले आहे.

 

 

तिच्या त्या फोटोंची चर्चा सगळीकडे आहे. अनेकांनी तिचं कौतूकही केलं आहे. या जोडीने 2018मध्ये प्रेमाची कबूली दिली होती. ही जोडी लग्न कधी करणार याच्या चर्चा नेहमी रंगतात. ही जोडी यावर्षी लग्नाच्या बेडीत अडकणार अशी चर्चा होती. पण अजूनतरी दोघांनीही याविषयी वाच्यता केली नाही. फरहान ‘तूफान’ नावाच्या सिनेमात दिसला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive