By  
on  

गांजाला परवानगी द्या म्हणणा-या उदय चोप्राला पोलिसांनी झापले

सध्या सिनेसृष्टीपासून दूर असलेला बॉलिवूड अभिनेता उदय चोप्रा आपल्या बेताल वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिवंगत दिग्दर्शक य़श चोप्रांचा मुलगा आणि निर्मात दिग्दर्शक आदित्य चोप्राचा भाऊ अशी उदयची अभिनेत्यापेक्षा ओळख आहे.

एक वादग्रस्त ट्विट करत त्याने नवीन वादाला तोंड फोडलं आहे. तो म्हणाला, माझ्या मते भारतात गांजाला परवानगी देण्यात यावी.कायदेशीर परवानगी गांजाला दिल्याने त्यावर कर आकारुन महसूलसुध्दा मिळू शकतो. गांजा हा आपल्या संस्कृतीचा एक भागच आहे. गुन्हेगारी भाग वगळता गांजाचे फायदेच फायदे आहेत.

https://twitter.com/udaychopra/status/1040211107523244032

मुंबई पोलिसांनी हे ट्विट वाचून उद्य चोप्राला चांगलंच झापलं. भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला आपलं मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण जरा सावध राहा. गांजा पिणं, गांजा बाळगणं ही नार्कोटिक्स ड्रग्स आणि/ सायकोट्रॉफिक सबटटन्स या कायद्यानुसार गुन्हा आहे, असं म्हणत पोलिसांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला.

https://twitter.com/MumbaiPolice/status/1040898786304909312

पोलिसांच्या या ट्विटवर उदयने पुन्हा प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला मी गांजा वापरत नाही पण आपला इतिहास पाहता मी असं म्हटलं. मला वाटतं हा शहाणपणाचा निर्णय ठरेल.

उदयने आपल्या होम प्रोडक्शनच्या म्हणजेच यशराज फिल्मसच्या बॅनरअंतर्गतच काही सिनेमे केले आहेत. मोहब्बते, मेरे यार की शादी है, धूम आणि निल अण्ड निक्की या सिनेमांमध्ये त्याने भूमिका साकारल्या.

Recommended

PeepingMoon Exclusive