By  
on  

अभिनेत्री पायल रोहतगीविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केली तक्रार

अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात पुणे पोलिसांनी कलम 153 (ए), 500, आयपीसी कलम 505 (2) आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पायलवर आरोप आहे की, ‘ तिने सोशल मिडियावर  महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या विरोधात व्हिडियो पोस्ट करुन अपमानास्पद शब्द वापरले होते. 

 

पुणे जिल्हा काँग्रेसच्या महासचिव संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पायलसोबतच आणखी एक सहआरोपीही आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, पायलने राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी, माजी प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्याबाबत आणि परिवाराबाबत अपमानास्पद व्हिडियो बनवला आहे आणि व्हायरल केला आहे. या व्हिडियोमुळे दोन समुदायात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही या तक्रारीत म्हणलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive