By  
on  

'बिग बॉस' फेम सिद्धार्थ शुक्लाचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन, रुग्णालयाने केलं कन्फर्म

हिंदी टेलिव्हिजन स्टार सिद्धार्थ शुक्लाचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालय. ही बातमी समोर येताच सगळ्यांनाच धक्का बसलाय. बिग बॉस 13 आणि हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा म्हणून सिद्धार्थची ओळख होती. मात्र ह्रदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचं निधन झाल्याचं समोर आलय. मुंबईतील कूपर रुग्णालयात त्याला मृत घोषीत करण्यात आलं. 

सिद्धार्थच्या मागे त्याची आई रिटा शुक्ला आणि मोठी बहीण आहे. 

सिद्धार्थने 'बाबुल का आंगन छुटे ना' या मालिकेतून 2008 मध्ये पदार्पण केलं होतं. 'बालीका वधू' मालिकेतून तो मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरा. 'खतरों कें खिलाडी' या कार्यक्रमातूनही तो दिसला होता. बिग बॉस 13 मधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. शिवाय तो बिग बॉस 13 चा विजेता ठरला. बिग बॉस ओटीटीमध्ये देखील त्याने शेहनाज गीलसोबत हजेरी लावली होती. शिवाय डान्स दिवाने या शोच्या मंचावरही तो काही दिवसांपूर्वी शेहनाजसोबत दिसला होता. सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. शिवाय त्याच्या चाहत्यांसाठीही हा मोठा धक्का ठरलाय.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive