By  
on  

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने हळहळलं बॉलिवुड, सोशल मिडीयावर वाहिली श्रद्धांजली

वयाच्या अवघ्या 40 वर्षी टेलिव्हिजन स्टार सिद्धार्थ शुक्लाने जगाचा निरोप घेतला. ह्रदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचं झोपेतच निधन झाल्याच समोर आलं आणि मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला. हिंदी टेलिव्हिजनवर स्टार म्हणून ओळख असलेल्या सिद्धार्थचे असंख्या चाहते आहेत. त्या चाहत्यांवर तर सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीने दु:खाचा डोंगर कोसळलाय. तर बॉलिवुडही सिद्धार्थच्या निधनाने हळहळलं.

 

सोशल मिडीयावर सिद्धार्थला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तर त्याच्यासोबत काम केलेले सहकलाकार आणि मित्रमंडळी त्याच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे.

 

बॉलिवुड अभिनेता मनोज वाजपयी, रवीना टंडण, कपील शर्मा, राजकुमार राव, शरद केळकर, रितेश देशमुख, विकी कौशल या कलाकारांसह अनेकांनी सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली आहे. 

 

तर मनोरंजन विश्वात काम करणारे त्याचे सहकलाकार आणि मित्रमंडळींनी त्याच्यासोबतचे फोटो शेयर करत दु:ख व्यक्त केलय. तर बिग बॉसमध्ये त्याच्यासोबत काम केलेल्या कलाकारांनाही मोठा धक्का बसलाय.

 

Recommended

PeepingMoon Exclusive