By  
on  

तब्बल दोन वेळा मरणाच्या दारातून परत आला होता सिद्धार्थ शुक्ला, घडली होती ही घटना..

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. ह्रदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थची झोपेतच प्राणज्योत मालवली. सिद्धार्थच्या जाण्यानं मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

पण यापूर्वी तब्बल दोन वेळा सिद्धार्थ मरणाच्या दारातून परत आलाय. 2014 मध्ये सिद्धार्थ एका मोठ्या अपघातातून बचावला होता. 2018 मध्ये सिद्धार्थच्या कारला मोठा अपघात झाला होता. तेव्हा सिद्धार्थची भरधाव कार तीन गाड्यांना धडकली होती. या अपघातात सिद्धार्थसह त्याच्यासोबतची मित्रमंडळीही गंभीर जखमी झाले होते. 

मात्र यावेळी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचा जीव घेतला. टेलिव्हिजनवरील या बड्या स्टारच्या अशा अचानक एक्झिटने शोक व्यक्त केलं जातय. सिद्धार्थने बालीका वधू या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तर बिग बॉस 13 या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता. खतरो के खिलाडी या शो देखील तो जिंकला होता. सध्या सोशल मिडीयावर सगळ्यात जास्त व्हायरल आणि ट्रेडिंग कलाकारापैकी तो एक होता. सिद्धार्थ आणि शहनाज गील ही जोडी तर बिग बॉस कार्यक्रमापासून चांगलीच चर्चेत राहिली.

Recommended

PeepingMoon Exclusive