By  
on  

क्या बात! अक्षय कुमारने स्विकारले सुई धागा चॅलेंज

सुई धागा सिनेमाच्या प्रमोशनसाठी कुठलीच कसर वरूण धवन आणि अनुष्का शर्मा सोडत नसल्याचे आपण सर्वच जाणतो. या दोघांनीही नुकतंच या प्रमोशनचा एक भाग म्हणून आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन बॉलिवूडमधील मित्रांना सुई धागाचं एक चॅलेंज स्विकारण्याचं आवाहन केलं आहे.

वरुण अनुष्काने आपल्या ट्विटर अकांऊटवरुन सुई धागा ओवण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ते दोघं म्हणतायत,आम्ही तर हे चॅलेंज स्विकारलंय आता तुमची वेळ आहे. सर्वांनी आपापले व्हिडीओ लवकरात लवकर शेअर करण्यासही त्यांनी सांगितलं आहे.

वरुण धवनने हे चॅलेंज बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारला दिल्यावर त्याने ते लगेचच स्विकारले आणि या चॅलेंजचा व्हिडीओ ट्विटरवर वरुण धवनला शेअर केला आहे. अक्षयला 10 सेकंदाच्या आत सुईमध्ये धागा टाकायचा होता पण तो त्यात यशस्वी ठरला आणि त्याने त्याला कॅप्शन दिलं, ‘जिसका काम उसी को साजे और करे तो डंडा बाजे, मौजी भाई’ दिसतं तेवढं सोप्पं नाही असं म्हणत त्याने या चॅलेंजसाठी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकरला नॉमिनेट केलं आहे.

https://twitter.com/akshaykumar/status/1041910604070576128

दरम्यान,ममता आणि मौजी म्हणजेच वरुण आणि अनुष्का ‘सुई-धागा’ सिनेमाच्या प्रोमोशनची कुठलीच संधी सोडत नाहीत. शरत कटारिया दिग्दर्शित सुई धागा मेड इन इंडिया हा सिनेमा येत्या 28 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ही कथा आहे, एका सामान्य व्यक्तीच्या असमान्य संघर्षाची आणि अथक प्रयत्नांची. मौजी आणि ममता आपल्या उद्योगातून एक भारतीय ब्रॅंड उदयास कसे आणतात, हे सिनेमात पाहता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाद्वारे मेक इन इंडियाला प्रोत्साहित करण्यात आले आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive