अश्रूंचा बांध फुटला ! सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यदर्शनाला शहनाज गिलची रडून रडून वाईट अवस्था

By  
on  

2021 ची सगळ्यात धक्कादायक बातमी म्हणजे सिद्धार्थ शुक्लाचं निधन. 40 वर्षांच्या सिद्धार्थ शुक्लाचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि सगळ्यांनाच धक्का बसला. ओशीवरा स्मशानभूमी येथे सिद्धार्थवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यासाठी त्याचे मित्रमंडळी आणि कुटुंबिय तिथे पोहोचलेत. 

यावेळी त्याची कथित गर्लफ्रेंड शहनाज गिल देखील त्याच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचलीय. मात्र तिची अवस्था अत्यंत वाईट होती.

 

शहनाजची रडून रडून वाईट अवस्था झाल्याचं पाहायला मिळालं. तिची शुद्ध हरपलीय कारण तिने तिचा सगळ्यात जवळचा व्यक्ति गमावलाय. 

शहनाजसह सिद्धार्थचे जवळचे मित्र आणि परिवार यावेळी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्याचं अंतीम दर्शन घेण्यासाठी पोहोचलाय. 

Recommended

Loading...
Share