By  
on  

सिद्धार्थ शुक्ला अनंतात विलीन, मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडला अंत्यसंस्कार विधी

ओशीवरा स्मशानभूमीत आज 40 वर्षीय अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिद्धार्थची आई रिटा शुक्ला, दोन्ही बहिणी, शहनाज गिल आणि इतर मित्र परिवार उपस्थित होता. जड अंत:करणाने सगळ्यांनी सिद्धार्थला अखेरचा निरोप दिला. पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्या मित्रमंडळींनी त्याचं अंतिम दर्शन घेतलं.

यावेळी बिग बॉस 13 मध्ये सिद्धार्थसोबत स्पर्धक म्हणून दिसलेली आणि त्याच्या अत्यंत जवळची कथित गर्लफ्रेंड शहनाजची मात्र रडून रडून वाईट अवस्था झाली होती.  

 

याशिवाय मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार यावेळी आपल्या मित्राला शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. सिद्धार्थच्या व्यक्तिमत्त्वाने त्याने कायम माणसं जोडली होती. हीच खास लोकं आज त्याच्या अंत्यदर्शनासाठी येताना भावुक दिसली. कमी कालावधीत यशाच्या शिखरावर पोहोचलेला हा कलाकार जग सोडून गेला मात्र चाहत्यांच्या आणि त्याच्या जिवलगांच्या मनात तो कायम घर करून राहील. 

Recommended

PeepingMoon Exclusive