........म्हणून नेहा धुपियाने लपवली प्रेग्नेन्सी

By  
on  

बॉलिवूडमधील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री नेहा धुपियाने आपल्याकडे गोड बातमी असल्याची बातमी तब्बल सहा महिने सर्वांपासून लपवून ठेवली होती. पण तिने असं का केलं, हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. पण तिने याबबतचा एक खुलासा नुकताच केला आहे. तो वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

एका मुलाखतीत नेहाने सांगितलं, मला भीती वाटायची की लोक मला माझ्या प्रेग्नेन्सीमुळे काम देणं बंद करतील म्हणून मी सहा महिने हे जगापासून लपवून ठेवलं. इंडस्ट्रीत काय विचार करतील असं वाटायचं. सुदैवाने या दरम्यान माझं पोटसुध्दा दिसलं नाही. पण मी माझ्या कामासाटी नेहमीच तयार असते.मला कामाचा कधीच कंटाळा येत नाही.

बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री नेहा धुपिया लवकरच काजोलसह ‘हेलिकॉप्टर इला’ सिनेमामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.परंतु या सिनेमातील तिच्या भूमिकेपेक्षा नेहाने यंदा मेमध्ये अभिनेता अंगद बेदीसोबत लग्न केलं होतं. नेहा आणि अंगद लग्नापूर्वी दोघंही रिलेशनशीपमध्ये होते. क्रिकेटर असणा-या अंगदने मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘फालतू’, ‘उंगली’, ‘पिंक’, ‘टायगर जिंदा है’ सिनेमांमधून त्याने भूमिका साकारल्या आहेत.

बी टाऊनमधील अभिनेत्री करिना कपूर खान आणि सोहा अली खान या दोघींना मातृत्वसुख लाभल्यानंतर आता नेहा आई होण्यासाठी सज्ज झाली आहे.

Recommended

Loading...
Share