By  
on  

पाहा Photo : माधुरी दीक्षितने वाढवले चाहत्यांच्या ह्रदयाचे ठोके, दिसली मराठमोळ्या लुकमध्ये

धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे असंख्य चाहते आहेत. सोशल मिडीयावर तर माधुरीचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांना माधुरीच्या विविध लुकची उत्सुकता ही कायम असते. विविध कार्यक्रम आणि फोटोशूटच्या माध्यमातून माधुरीचे हटके लुकमधील फोटो चाहत्यांना माधुरीच्या सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतात. 

नुकतच माधुरीने खास लुकमधील फोटो शेयर केले आहेत. हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या फोटोंमध्ये माधुरीने मराठमोळा लुक केलाय.

सुंदर मोरपीसी रंगाची साडी, नथ, चंद्रकोर असा माधुरीचा महाराष्ट्रियन लुक यात पाहायला मिळतोय.

'डान्स दिवाने' या कार्यक्रमाच्या निमित्ताने माधुरी अनेक विविध वेस्टर्न लुकमध्ये दिसते. मात्र हा मराठमोळा लुक पाहुन माधुरीचे मराठी चाहते मात्र सुखावलेत. या फोटोंवर मोठा प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झालाय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive