आसामी सिनेमा ‘व्हिलेज रॉकस्टार’ निघाला ऑस्करवारीला

By  
on  

यंदा ऑस्करसाठी भारतातर्फे कोणता सिनेमा पाठविण्यात येणार याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं होतं. पण अखेर आता एका नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आसामी 'व्हिलेज रॉकस्टार' सिनेमाची ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत निवड करण्यात आली आहे. या सिनेमाने यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बेस्ट फिचर फिल्मचा पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविली आहे.

 

'पद्मावत', 'राजी', 'पिहू', 'कड़वी हवा' आणि 'न्यूड' या सिनेमांना मागे टाकत 'व्हिलेज रॉकस्टार्स' सिनेमाने ऑस्करवारीला जाण्यासाठी बाजी मारली. रिमा दास दिग्दर्शित या सिनेमात एका 10 वर्षीय मुलीची कथा रेखाटण्यात आली आहे. तिला संगीत क्षेत्रात आपलं नाव मोठं करण्याची इच्छा आहे. 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखसुध्दा नुकतीच जाहीर झाली आहे. येत्या 28 सप्टेंबरला हा सिनेमा भारतात प्रदर्शित होत आहेत.

https://twitter.com/rameshlaus/status/1043379702788833281

'व्हिलेज रॉकस्टार्स' सिनेमा अनेक सिनेमहोत्सवांमध्ये दाखविण्यात आला असून समीक्षकांकडून त्याचं बरंच कौतुक झालं होतं. रिमा दास यांनीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या सिनेमाबद्दलची ही आनंदाची बातमी सर्वांना दिली.

Recommended

Loading...
Share