By  
on  

अभिनेता रजत बेदीवर पादचा-याच्या अंगावर गाडी घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अभिनेता अभिनेता रजत बेदीच्या विरोधात मुंबईतील डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एका पादचा-याला रजतच्या कारने धडक दिल्याचा आरोप आहे. एएनआयच्या वृत्तानुसार अभिनेता रजतने त्याजखमी झालेल्या व्यक्तीला कूपर रुग्णालयात नेलं असून त्यावर उपचार सुरु आहेत.

 

संबंधित व्यक्ती नशेत होती. या दरम्यान रस्त्याने जात असताना रजतच्या गाडीची त्याला धडक बसली आहे. रजतने या व्यक्तीला उपचारासाठी आवश्यक ती मदत करण्याचं ठरवलं आहे. रजत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तसंच कारच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सरु आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive