सिडनी विमानतळावर शिल्पा शेट्टीला वर्णद्वेषावरुन हिणवलं

By  
on  

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा वर्णद्वेषावरुन अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियात ही घटना घडली असून एअरलाईनवर कर्मचा-यांवर तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.

शिल्पा सिडनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मेलबर्नला जात होती. त्यावेळेस तिला विमानतळावर एअरलाईनच्या कर्मचा-याकडून अति सामान असल्याचे कारण देत अडवण्यात आलं. तिने यावेळेस चिडून सोबत असलेल्या आपल्या सामानाचा फोटोसुध्दा शेअर केला आहे. ती म्हणते माझ्याजवळील सामान जास्त असल्याचे कारण तेथील उपस्थित कर्मचा-याने पुढे केलं आणि माझी त्यांनी थट्टा उडवली. मी गौरवर्णीय नसल्याने त्यांनी मला वर्णद्वेषावरुन हिणवलं. माझ्या त्वचेचा रंग वेगळा आहे, म्हणून माझ्यावर कमेंट्स पास करण्यात आल्या. एकंदरीतच या घटनेमुळे शिल्पाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.

https://www.instagram.com/p/BoDOpZLhxBH/?utm_source=ig_embed

सिडनी विमानतळावरुन मेलबर्नला प्रवास करणा-या शिल्पाला यापूर्वीसुध्दा अशा दु:खद अनुभवाचा सामना करावा लागला होता. बिग ब्रदर या रिएलिटी शोमध्ये शिल्पासोबत सहभागी झालेल्या इतर स्पर्धकांनी तिला वर्णद्वेषावरुन अपमानास्पद वागणूक दिली होती. त्यानंतर पुन्हा इतक्या वर्षांनी हा प्रसंग घडला. शिल्पाच नाही तर प्रियंका चोप्रा, रिचा चढ्ढा या बॉलिवूड अभिनेत्रींनासुध्दा वर्णद्वेषाचा सामना करावा लागला होता.

Recommended

Loading...
Share