54 व्या वाढदिवसानिमित्त आईच्या आठवणीत व्याकूळ झाला अभिनेता अक्षय कुमार

By  
on  

काल अभिनेता अक्षय कुमारच्या आईने अखेरचा श्वास घेतला. आज अक्षयचा 54 वा वाढदिवस आहे. पहिल्यांदाच अक्षय आईशिवाय वाढदिवस साजरा करतो आहे. वाढदिवसानिमित्त जुना फोटो शेअर करत अक्षयने आईच्या आठवणींना वाट करुन दिली आहे. ‘हे असं कधीच आवडलं नसतं. पण मला माहिती आहे आई माझ्यासाठी तिथेही हॅपी बर्थ डे टू यू गात असणार. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

तुम्ही दाखवलेल्या संवेदना आणि शुभेच्छांसाठी आभार. आयुष्य प्रवाही आहे.’ काल अ‍क्षयने एक भावनिक पोस्ट करत ही बातमी शेअर केली होती. ‘ती माझं सर्वस्व होती आणि आज मला असह्य दुःख होत आहे. माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुसऱ्या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. मी आणि माझे कुटुंब कठीण काळात असताना तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती.’ यानंतर अनेक कलाकारांनी अक्षयच्या घरी सांत्वन करण्यासाठी हजेरी लावली होती.

Recommended

Loading...
Share