गाढवावर स्वार झालाय हा फिरंगी, पाहा आमिर खानचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मधील लूक

By  
on  

बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खानचा आगामी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमातील लूक नुकताच उलगडला आहे. एका हटके फिरंगी अवतारात आमिरला या पोस्टरवर पाहायला मिळतंय. यशराज फिल्म्सच्या ट्विटरवर हा लूक शेअर करण्यात आला आहे. तसंच तुम्ही या ठगसाठी कधीही तयार होणार नाहीत असं धम्माल कॅप्शन शेअर केलं आहे.

आमिर खान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असेलला 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमातील आमिरच्या लूकची सर्वांनाच प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. फिरंगी या आगळ्या वेगळ्या भूमिकेत पाहून सर्वांनाच आमिरच्या या लूक वरुन प्रसिध्द हॉलिवूडपट सिरीज पायरेट्स ऑफ कॅरेबियनमधील जॅक स्पॅरोची आठवण येतेय. त्यामुळे आमिरची व्यक्तिरेखा त्याच्या जवळ जाणारी आहे का असा प्रश्न आता सर्वांना पडलाय.

https://twitter.com/yrf/status/1044094438102962176

 

डोक्यावर टोपी, मस्त गॉगल आणि मोठे कुरळे केस असा आमिरचा हा लूक प्रेक्षकांना नक्कीच ऑवडणारा आहे. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मधील प्रत्येक व्यक्तिरेखा दररोज उलगडत आहेत. म्हणूनच प्रचंड आतुरता असलेली आमिरची ही फिरंगी व्यक्तिरेखा आज उलगडली.

यशराज फिल्म्सचा हा बिग बजेट सिनेमा यंदा दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Recommended

Loading...
Share