By  
on  

‘रेशमाच्या रेघांनी’ गाण्यावर या बॉलिवूड अभिनेत्रींसह थिरकली माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षितला मराठी लूकमध्ये पाहणं तिच्या चाहत्यांसाठी जणू पर्वणीच असते. पण या सगळ्या लूकमध्ये मराठी गाण्यावर माधुरीचं नृत्य पाहायला मिळणं म्हणजे अगदी दुग्धशर्करा योग. नुकताच डान्स दिवाने या शोच्या मंचावर हा योग जुळून आला. यावेळी माधुरीसोबत यामी गौतम आणि जॅकलीन फर्नांडिसही दिसून आल्या.

 

 

विशेष म्हणजे माधुरी अगदी मराठमोळ्या अंदाजात दिसून आली. माधुरी दीक्षितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडियो शेअर केला आहे. यामी आणि जॅकलिनही सुरेख ट्रॅडिशनल अंदाजात दिसत आहेत. यावेळी ‘रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी’ या लावणीवर ठुमकेही लगावले. नेटिझन्सनीही यावर कमेंट्स करत कौतुक केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive