By  
on  

जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूर लवकरच ऑनस्क्रीन एकत्र दिसणार

 जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूर हे दोघं सावत्र बहिण-भाऊ असले तरी आता श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांच्यातला दुरावा बराचसा कमी झाला आहे. एरव्ही कधीही एकमेकांसमोर न येणारी ही भावंड हल्ली कुठल्याही कौटुंबिक कार्यक्रमात किंवा बाहेरील इव्हेंट्स, पार्टीत हमखास एकत्र दिसतात. त्यांच्यात आता छान मैत्रीचं नातं खुलत असल्याचं सर्वांनाच जाणवू लागलं आहे

अर्जुन आपली सख्खी बहिण अंशुलाप्रमाणेच जान्हवी आणि खुशी या बहिणींची काळजी घेतो. त्याला आता मोठ्या भावाची जबाबदारी चांगलीच समजू लागली आहे. जान्हवी आणि अर्जुन या दोघांना आता लवकरच ऑनस्क्रीन एकत्र पाहायला मिळणार आहे. तुम्हाला वाटेल हे दोघं कुठल्या सिनेमानिमित्त एकत्र येत नाहीत ना....नाही तसं काही अद्याप तरी नाही. पण दोघंही करण जोहरचा प्रसिध्द चॅट शो कॉफी विथ करणच्या आगामी सीझनमध्ये एकत्र हजेरी लावणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार या शोमध्ये एकत्र उपस्थित राहण्यासाठी करण जोहरने जान्हवी आणि अर्जुनला खास निमंत्रण पाठवलं आहे. ही एक पहिलीच संधी असेल जिथे हे दोघंही आपल्या बहिण-भावाच्या नात्याविषयी हे दोघं मनातलं एकमेकांसमोर मांडतील. करण तर त्यांना या शोमध्ये बोलतं करणार यात काहीच शंका नाही.

https://twitter.com/karanjohar/status/1030770587403264000

जान्हवी आणि अर्जुनला जेव्हा हे निमंत्रण मिळालं तेव्हा दोघांनीसुध्दा आपला होकार लगेचच कळवला आहे. आता करण त्यांना कोणते प्रश्न विचारुन भंडावून सोडणार आणि त्यांच्या मनातलं ओठावर कसं आणणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive