प्रियंका चोप्राने शेअर केला जान्हवी आणि खुशी कपूर सोबतचा फोटो

By  
on  

भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब अंबानी यांची लाडकी लेक ईशा अंबानी हिचा साखरपुडा पीरामल परिवाराच्या आनंद पीरामल याच्यासोबत २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान इटलीच्या लेक कोमो येथे आयोजित करण्यात आला होता. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या शानदार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. तसंच तीन दिवस सुरु असणा-या या सोहळ्याला अनेक मोठे उद्योगपतीसुध्दा हजर होते.

तुम्हाला माहितच आहे, बॉलिवूडची देसी गर्ल आणि अमेरिकन पॉप सिंगर निक जोनस यांचासुध्दा साखरपुडा मागच्याच महिन्यात पार पडला आहे. निक आणि प्रियंकानेसुध्दा ईशा अंबानीच्या या साखरपुड्याला इटलीत आवर्जून हजेरी लावली होती. मनिष मल्होत्राने डिझाईन केलेल्या साडीत प्रियंका व मनिषनेच डिझाईन केलेल्या ट्रेडिशनल वेअरमध्ये हे दोघं सोहळ्यात झळकले होते. तसंच यांच्यासोबतच श्रीदेवी व बोनी कपूरच्या मुली जान्हवी आणि खुशी कपूरचासुध्दा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. तसंच नवीन लग्न झालेलं जोडपं आनंद अहुजा व सोनम कपूरसुध्दा प्रियंका आणि निकसोबत इटलीत फिरताना दिसले.

https://www.instagram.com/p/BoJyDvGAFOb/?taken-by=priyankachopra

सेलिब्रिटी जरी इटलीतील या सोहळ्यावरुन परतले असले तरी त्या सुंदर आठवणी त्यांच्या मनात घर करुन आहेत. म्हणूनच प्रत्येक सेलिब्रिटी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन तेथील अप्रतिम फोटो शेअर करत आहेत. प्रियंका चोप्राने नुकताच जान्हवी आणि खुशी या कपूर बहिणींसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. यात या तिघींचासुध्दा स्टायलिश अवतार पाहायला मिळतोय. यापूर्वी प्रियंकाने आनंद अहुजा आणि सोनम कपूरसोबतच्या पूल पार्टीचे काही फोटो शेअर केले होते. त्यावेळी या सेलिब्रिटींचे बोल्ड आणि ब्युटीफुल फोटो पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली.

Recommended

Loading...
Share