तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपात किती तथ्य?

By  
on  

मराठी सिनेसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही दिग्गज अभिनेते अशी ओळख असलेले नान पाटेकर या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपण सर्वच जाणतो. नेहमीच त्यांचा करारी बाणा आपल्याला पाहायला मिळला आहे. संवेदनशीलतेबरोबरच सामाजिक भान जपण्यात नाना नेहमीच अग्रेसर असतात. पण याच अष्टपैलू अभिनेते नाना पाटेकरांवर एक खळबळजनक आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे.

एका टीव्ही चॅनेला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री म्हणाली,“ कामाच्या ठिकाणी अनेकदा स्त्रियांसोबत असभ्य वर्तवणूक केली जाते.‘ हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नानांनी माझ्यासोबत असभ्य वर्तवणूक केली होती.” #MeToo या मोहिमेबद्दल बोलताना तिने हा आरोप केल. ती पुढे म्हणाली, “नाना नेहमीच अभिनेत्रींसोबत असभ्य वागतात. अनेक अभिनेत्रींना त्यांनी सेटवर मारहाणसुध्दा केलीय. पण कोणीच या प्रकाराला वाचा फोडत नाही. मोठ्या कलाकारांनी त्यांच्यासोबत काम करणं सुरुच ठेवलं तर ते पुन्हा तसंच वागतील आणि #MeToo मोहीम यशस्वी होऊ शकत नाही.”

तनुश्रीच्या या आरोपांमुळे सर्वांनाच एक प्रकारे धक्का बसला आहे. पण तूर्तास तरी या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे सांगणं उचित ठरणार नाही. जर ती खरं बोलतेय तर ज्या अभिनेत्रींना असा अनुभव आला असेल तर त्या गप्प का बसल्या आणि तनुश्रीने 10 वर्षांनी हे आरोप का केलेत, हा कुठला पब्लिसिटी स्टंट तर नाही? या सर्व प्रश्नांची उत्तर लवकरात लवकर मिळतील अशी आपण आशा करुयात किंवा दस्तरखुद्द नानाच या संपूर्ण वक्तव्यावर काही प्रतिक्रिया देतायत का याची वाट पाहूयात.

बॉलिवूडमध्ये फक्त हाताच्या बोटांवर मोजण्या इतके सिनेमे करणारी तनुश्री सध्या या चंदेरी दुनियेपासून लांब गेली आहे. नुकतीच अमेरिकेतून ती भारतात आली आणि या नवीन वादाला तिने तोंड फोडलं.

Recommended

Loading...
Share