निधनानंतर 2 महिन्यानंतर बंद होणार दिलीप कुमार यांचं ट्वीटर हँडल

By  
on  

अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन होऊन दोन महिन्याहून अधिक काळ लोटला गेला आहे. आता दिलीप कुमार यांच्या कुटुंबाचे स्नेही फैसल फारुकी यांनी सायराबानो यांच्या सहमतीने ट्वीटर अकाउंट बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी दिलीप कुमार यांचा एक फोटो पोस्ट करत ही घोषणा केली आहे.

 

आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘खुप चर्चा आणि विचारविमर्श केल्यानंतर सायराबानोच्या सहमतीने प्रिय दिलीप कुमार यांचं ट्वीटर अकाउंट बंद करण्याचं ठरवलं आहे. तुमच्या प्रेमासाठी आभार.’ या निर्णयावर दिलीप यांच्या फॅन्सनी मात्र नाराजी दर्शवली आहे. एका युजरने ‘हे फक्त अकाउंट नाही तर ऐतिहासिक वारसा आहे.’ अशी कमेंट केली आहे.

Recommended

Loading...
Share