Wow बॉलिवूड सुपरस्टार्स इन वन फ्रेम!

By  
on  

आपण आपल्या आवडत्या कलाकारांना जेव्हा सिनेमात ऑनस्क्रीन पाहतो तेव्हा फार खुश होतो. पण असं कधी झालंय का की, अनेक सुपरस्टार्स सेलिब्रिटींना आपण एकत्र एन्जॉय करताना पाहिलंय. पण आता हे सर्व शक्य होत आहे ते म्हणजे सोशल मिडीयामुळे. आज कुठलाही प्रसंग असो किंवा खास क्षण आपल्या चाहत्यांसोबत तो शेअर करण्याचं सेलिब्रिटींचें हक्काचं ठिकाण म्हणजे सोशल प्लॅटफॉर्म.

प्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने नुकताच बॉलिवूडचा एक आयकॉनिक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. मोठ्या सुपरस्टार्सबरोबर आजच्या युवा सुपरस्टार्सना एकत्र एकाच वन फ्रेममध्ये बंदिस्त करण्याची किमया करण जोहरच करु शकतो आणि त्याने ते सिध्द केलं आहे.

करणच्या या फोटोत बॉलिवूडकरांचा हा मस्तीखोर अंदाज पाहायला मिळतोय. करणसोबत सोफ्यावर शाहरुख खान आणि आलिया भट त्याला बिलगून बसली आहे तर त्यांच्या शेजारी मि.परफेक्शनिस्ट आमिर खानला पाहून आश्चर्याचा धक्का बसतोय. तर यांच्या मागेच रणवीर सिंह आणि दिपीका पादुकोण या लव्हबर्ड्सच्यामध्ये चक्क रणबीर कपूर बसलाय.

https://www.instagram.com/p/BoM_MDxHAWO/?taken-by=karanjohar

कोणत्यातरी पार्टीनिमित्त हे सर्व बॉलिवूडचे मोठे सेलिब्रिटी एकत्र जमले होते. यावेळी आमिर खानने सर्वांना ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चा ट्रेलरसुध्दा दाखवला, जो अद्याप प्रदर्शित झालेला नाही. या सर्वांनाच तो प्रचंड आवडला असून सर्वांनी त्याचं या सिनेमासाठी खुप कौतुक केलं.

Recommended

Loading...
Share