By  
on  

पाहा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चा शानदार ट्रेलर,हॉलिवूडला देतोय टक्कर

एखाद्या हॉलिवूड सिनेमाला तोडीस तोड असा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. वीएफ्कसचा जबरदस्त वापर आणि बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर पाहता हा सिनेमा स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटीशांसोबतच्या संघर्षावर भाष्य करतोय. महानायक अमिताभ बच्चन आणि मि. परफेक्शिन्ट आमिर खान यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणं हे या सिनेमाचं खास वैशिष्ट्य.

450 कोटींच्या भल्यामोठ्या बजेटमध्ये आकारास आलेला हा ठग्स ऑफ हिंदोस्तानकडून प्रेक्षकांच्या अरपेक्षाही उंचावल्या होत्या, पण आता हा ट्रेलर पाहता हा सिनेमा पुरेपूर पैसा वसूल ठरणारच अशा चर्चा रंगल्या आहेत. विजय कृष्ण आचार्य यांचं  दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचं बरचसं शूटींग माल्टा आणि राजस्थान येथे पार पडलं आहे. बिग बी यांची आजाद ही व्यक्तिरेखा सिनेमाचं मुख्य आकर्षण ठरतंय तर आमिरचा फिरंगी भाव खाऊन जातोय.  कतरिना आमिरच्या प्रेयसीच्या रुपात जादू करतेय आणि फातिमा आपला अॅक्शन अंदाज दाखवतेय.

ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतात आली आणि भारतावर राज्य करु लागली तेव्हा भारतीयांपैकी काही लोकांनी याविरुध्द बंड पुकारले व तेव्हा जे काही अॅक्शन आणि नाट्यमय घडामोडी कशा सुरु झाल्या हे सिनेमात पाहायला मिळणार आहे.

https://youtu.be/zI-Pux4uaqM

यंदा दिवाळीत हा सिनेमा कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत पाहणं एक पर्वणीच ठरणार आहे, यात शंका नाही. येत्या 8 नोव्हेंबरला 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हिंदीबरोबरच तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive