शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची अखेर जामिनावर सुटका

By  
on  

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पोर्नोग्राफी प्रकरणात 19 जुलै रोजी अटक केली होती. त्याच्याविरोधात सबळ पुरावे सापडल्याने न्यायालयीन कोठडीतसुध्दा वाढ करण्यात आली. पण अखेर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना दिलासा मिळाला आहे. राज आणि त्याच्या कंपनीचा आयटी प्रमुख रॉयन थापा याला न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. तब्बल 62 दिवसांनंतर राज कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला आहे. अश्लील व्हिडीओ प्रकरणी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

राज कुंद्रा आता कारागृहातून बाहेर आला आहे. कारागृहातून बाहेर पडताचं राजचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये राजला टिळा लावल्याचं दिसून येत आहे. राज कुंद्रा अश्लील चित्रपटांप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलनं 1500 पानांची सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार या चार्जशीटमध्ये 43 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. 

महत्त्वाचं म्हणजे पतीला जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चर्चेत आहे.  मोठ्या वादळानंतरही चांगल्या गोष्टी घडतात', असं लिहित शिल्पानं एक फोटो तिच्य़ा इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला. मुंबई उच्च न्यायालयाकडून सोमवारी राज कुंद्रा याला जामीन मंजूर करण्यात आला.

Recommended

Loading...
Share