By  
on  

फॅमिली टाईम: लाडक्या तैमूरसोबत फिरतोय सैफ

सेलिब्रिटी म्हटलं की आपल्या बिझी शेड्यूलमुळे त्यांना स्वत:साठीसुध्दा कधी कधी वेळ मिळत नाही. तर शूटींगनिमित्त नेहमी देश-विदेशात असल्याने आपल्या कुटुंबासोबतसुध्दा हवा तितका क्वालिटी टाईम त्यांना घालवता येत नाही आणि जर त्यात लहान मूल घरात असेल तर अर्धा जीव घरात अडकतो. हल्ली असंच काहीसं बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि त्याची बेगम करिना कपूर खान यांच्यासोबत होताना दिसून येतंय.

घरी इतका गोंडस तैमूर असल्याने सैफ आणि करिनाला आपण कधी शूटिंग संपवून त्याच्यासोबत खेळतो असं होऊन जातं. नुकतंच सैफ अली खानला आपला मुलगा तैमूरसोबत मुंबईत स्पॉट करण्यात आलं. सैफ आपल्या आगामी सिनेमा हंटरच्या लूकमध्ये यावेळी दिसून आला तर छोटा तैमूर ऑरेंज टी शर्ट आणि शॉर्ट पॅंटमध्ये खुपच क्यूट दिसतोय. स्टार किड तैमूर सर्वांना किती आवडतो हे आपण जाणतोच.

 

सैफनंतर सैफची बहिण सोहा अली खानसुध्दा आपली गोंडस मुलगी इनाया खेमूसोबत बाहेर फिरताना दिसली.

Recommended

PeepingMoon Exclusive