By  
on  

‘आईच्या हातात सापडेल त्याने मी मार खाल्ला आहे’ काजोलचा खुलासा

अभिनयाचा संपन्न वारसा मिळालेल्या अभिनेत्री तनुजा यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी काजोलची एक मुलाखत समोर येताना दिसते आहे. यामध्ये काजोलने तनुजा यांच्या शिस्तीचा खुलासा केला आहे. काजोलचा आताचा अंदाज बबली आणि खोडकर वाटत असला तरी लहानपणी मात्र तनुजा यांच्या कडक शिस्तीला तिला सामोरं जावं लागलं होतं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

 

याबाबत बोलताना काजोल म्हणते, ‘आईचं आमच्यावर प्रेम होतं पण तिने आमचे अतिलाड कधीच केले नाहीत. तिला आम्ही शिस्तप्रिय आईच्या भूमिकेत पाहिलं आहे. मुलांना वळण लावण्यासाठी मार गरजेचा असतो असं तिला नेहमी वाटायचं. यामुळे अनेकदा मी आईचा बॅडमिंटन किंवा रॅकेटने मार खाल्ला आहे.

एवढंच नाही कधी कधी तर ती हातात जे मिळेल ते फेकून मारायची. कित्येकदा तिने मला भांडीही फेकून मारली आहेत.’ काजोल पुढे म्हणते, मात्र १३ व्या वाढदिवशी तिने हा सिलसिला थांबवला. “मी यापुढे तुझ्यावर हात उचलणार नाही. मात्र जर मला वाटलं की तू काही चुकीचं करत आहेस. मग मात्र मी मागे पुढे पाहणार नाही. तुला तुझ्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी. म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. तनुजा यापुर्वी ‘पितृऋण’ या सिनेमात दिसल्या होत्या.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive