सलमान खान लहान मुलांसाठी घेऊन येणार हे सरप्राईज

By  
on  

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानला लहान मुलं प्रचंड आवडतात. तो नेहमीच घरी आपला बराचसा वेळ आपल्या भाच्यांसोबत खेळण्यात घालवतो. लहानांसोबत लहान होऊन खेळणा-या सलमानचे फोटो नेहमीच व्हायरल होतात. अनेकदा सामाजिक भान जपणा-या सलमानला अनाथ मुलांसोबतसुध्दा काहीतरी स्पेशल करताना स्पॉट केलं जातं.

आता लहान मुलांचा लाडका हिरो सलमान खान लवकरच त्यांच्यासाठा एक सरप्राईज घेऊन येणार आहे.  सलमान खान पिल्म्स प्रोडक्शन आता सिनेमांव्यतिरिक्त टीव्ही आणि डिजीटल प्लॅटफॉर्मवरुनसुध्दा मनोरंजनाचा नजराणा सादर करणार आहेत. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार सलमान वेबसिरीजच्या तयारीला लागला आहे. त्याने यासाठी उत्तम लेखकांची एक टीम नेमली असून त्याने चार वर्षांवरील मुलांसाठी एक कार्यक्रम बनवू इच्छितो. सलमानच्या मते एक असा शो त्याला तयार करायचा आहे, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं एकत्रित मनोरंजन होऊ शकेल.

सलमान खानला नेहमीच प्रेक्षकांना जे आवडतं ते द्यायला आवडतं. तसंच सिनेइंडस्ट्रीत नवीन चेह-यांना संधी देण्यासाठी ओळखला जातो. सलमान खान फिल्मस अंतर्गत नवनवीन विषयांवर तो सिनेमांची निर्मितीसुध्दा करतो आणि यंग टॅंलेण्टला लॉंचसुध्दा.

सलमान खान सध्या आपली बहिण अर्पिता खानचा नवरा आयुष शर्माचा बॉलिवूड पदार्पण असलेल्या लवयात्री सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये आहे. सलमान खानची निर्मिती असलेला लवयात्री हा सिनेमा येत्या ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होत आहे.

Recommended

Loading...
Share