By  
on  

प्रतिक्षा संपली ! या दिवशी बहुप्रतिक्षित सुर्यवंशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

यावर्षीच्या बहुप्रतिक्षित सिनेमांमध्ये अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या सुर्यवंशी सिनेमाचा नंबर सगळ्यात पहिला आहे. या सिनेमाची उत्सुकता ट्रेलरमुळे जास्त वाढली होती. पण करोना काळात लॉकडाऊन लागल्याने या सिनेमाच्या डेट्स पुढे गेल्या होत्या. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

पण  येत्या 22 ऑक्टोबरपासून राज्यात चित्रपटगृह सुरु होणार आहेत. त्यामुळे येत्या काळात थिएटर पुन्हा गजबजणार आहेत. यासोबतच सुर्यवंशीच्या प्रदर्शनाचा मार्गही मोकळा झाला आहे. सिनेसमीक्षक तरन आदर्श यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये सुर्यवंशी दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे. निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि पॅन स्टुडियोचे चेअरमन जयंतीलाल गाडा यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर हा निर्णय घेतला गेला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive